भूमिका आणि जबाबदाऱ्या
ग्रामपंचायत अधिकारी कार्यसूची
०१) ग्रामपंचायत सचिव म्हणून व वित्तीय सल्लागार म्हणून काम
पाहणे
०२) ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेख जतन करणे
०३) ग्रामसभा, मासिक सभा ग्रामपंचायतीने ठरवून दिल्यानुसार घेणे
०४) फेर करआकारणी व कर वसुली करणे
०५) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमीन, रस्ते, इमारती ,पडीक जमीन
आणि सार्वजनिक इतर जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख
अद्यावत ठेवणे
०६) ग्रामदर्शन नकाशा ठेवणे
०७) लेखा परीक्षण शक पूर्तता करणे
०८) जन्म मृत्यू ,उपजत मृत्यू नोदणी करणे
०९) विवाह नोदणी करणे
१०) वार्षिक कृती आराखडा तयार करणे
११) निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करणे
१२) शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश यांचे पालन
करणे
१३) योजनांची अंमलबजावणी करणे
१४) विविध योजना राबवणे
१५) अधिनिस्त कर्मचारी यांच्या वर नियत्रण ठेवणे
ग्रामपंचायत ता. जि.जळगाव
गुणवत्ता धोरण २०२५
आम्ही आपल्या ग्रामपंचायतीतील नागरिकांना शासनाने ठरवून दिलेल्या सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही आमच्या गुणवत्ता व्यवस्थापक प्रणाली द्वारे सर्वोत्तम सेवा गावाच्या गरजेनुसार प्रकल्प मिळविणे आणि यशस्वीरीत्या राबविणे, प्रक्रियांचे सु-संचालन, कर्मचारी यांची कार्यक्षमता व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर प्रस्थापित करून त्यामध्ये सातत्याने सुधारणा करीत राहू. हे सर्व करीत असताना आम्ही पंचायत समिती एरंडोल जिल्हा परिषद जळगाव आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचना व भारतीय कायदा, राज्यघटना व इतर संबंधित कायद्याचे पूर्णपणे पालन करू.
ग्रामपंचायत ता. जि.जळगाव
सरपंचाचे अधिकार व कर्तव्य
०१) पंचायतीने संमत केलेले ठराव अमलात आणणे
०२) पंचायतीकडे सोपविलेले कर्तव्य रीतसर पार पडण्यास जबाबदार आहे
०३) पंचायतीच्या सभा बोलविणे, सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे
०४) पंचायतीच्या सर्व अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी केलेली कार्यवाही व कृत्ययावर देखरेख व नियंत्रण ठेवणे
०५) आवशक असलेली सर्व विवरण पत्रे व प्रतीवृत्ते तयार करण्याची व्यवस्था करणे
०६) ग्रामसभेच्या बैठकी बोलावणे व सदर बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे
०७) शासनाच्या कोणत्याही निदेशान्व्ये देणे आवश्यक असतील अशी प्रमाणपत्रे देणे
०८) सचिवाच्या ताब्यात नोंद वह्या ठेवणे, त्यावर देखरेख ठेवणे व वेळोवेळी तपासणे
ग्रामपंचायत ता. जि.जळगाव
उपसरपंचाचे अधिकार व कर्तव्य
०१) सरपंच यांच्या गैरहजेरीत त्यांची कर्तव्य निभावणे
०२) केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावांमध्ये प्रभावी पणे राबविणे
०३) ग्रामसभेत शासनाच्या विविध योजनांतर्गत पात्र लाभार्थींची निवड करणे
०४) विविध प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतीस व ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणीचे योग्य प्रकारे निराकरण करणे
०५) गावातील शिक्षण व आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे
०६) शासनाच्या धोरणानुसार आवश्यक तो सल्ला घेणे, सरपंच यांच्याशी चर्चा करणे, विविध सभांना हजार राहणे तसेच नियंत्रना खालील व विभागातील कामकाजावर व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे
ग्रामपंचायत ता. जि.जळगाव
कर्मचारी अधिकार व कर्तव्य
- ग्रामपंचायत कार्यालयात्तील रजिस्टर/फाईल/दस्तावेज तसेच पुस्तके व किल्ली यांचे योग्य जतन करणे/निगा राखणे
- संबंधिताना त्यांच्या कामाच्या ठिकाणी/कार्यालयात वेळेत उपस्थित राहून त्यांचेकडे दिलेले काम वेळेत पूर्ण करणे,सादर काम निष्टा,प्रामाणिक पणे पार पाडणे.
- कामाच्या ठिकाणी वेळेवर येणे.तसेच कार्यालयीन वेळेपर्यंत काम करणे.
- कार्यालय सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर उपस्थित राहून साफसफाई,टेबल,कपाट,फर्निचरची सफाई करणे.
- कार्यालय मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
- ग्रामपंचायतीची करवसुली करणे.
- गावामधील दिवाबत्ती कडे लक्ष ठेवून दुरुस्ती बाबत ग्रामपंचायतीस माहिती देणे.
ग्रामपंचायत ता. जि.जळगाव
पाणी पुरवठा कर्मचारी अधिकार व कर्तव्य
१) गावास सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा करणे.
२) लिकेज ची माहिती ग्रामपंचायतीस देऊन वेळेवर दुरुस्ती करणे.
३) गावातील पाणी स्त्रोतांचे नमुने घेण्यासाठी आरोग्य सेवकांना मदत करणे.
४) उपरोक्त शिवाय ग्रामपंचायतीने वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
ग्रामपंचायत ता. जि.जळगाव
माहितीचा अधिकार अधिनियम –२००५ अन्वये नियुक्त केलेले अधिकारी
जन माहिती अधिकारी
ग्रामपंचायत अधिकारी तथा सचिव
ग्रामपंचायत ता.
प्रथम अपिलीय अधिकारी
मा.सहाय्यक गटविकास अधिकारी
पंचायात समिती जि.
टिप– अर्जदाराने आपल्या अर्जावर मोबाईल क्र.लिहावा
जन्म,मृत्यू,उपजत मृत्यू, २१ दिवसाच्या आत नोंदवा
व विवाह नोंदी वेळेवर करा
कार्यालयीन कामकाजाची वेळ
सकाळी १०:०० ते ६:०० वा.
संपर्क माहिती
ग्रामपंचायत कार्यालय
तालुका - , जिल्हा -, - महाराष्ट्र - 400001.



